prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – गारवा

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – गारवा

0
99

गारव्याने गारठली
मूठ ही बाळाची
हातमोजे त्याला घाला
हिवाळा सुरू झाला.

कानटोपी, गोंडा वरती
स्वेटर अंगावरती
शाल पांघरा पायांवरती
ते तर घरात फिरत राहती.

एका जागी कुठे थांबते
बाळ खेळण्या धडपडते
ऊब त्याला देण्यासाठी
आईची माया सरसावते.

खिडक्या दारे बंद होता
गारठाही होतो कमी
लोकरीचा अंगरखाही
बाळ काढून देई सारूनी.

डाॅ. सौ. स्मिता सदानंद मुकणे.
ठाणे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here