
गार गार हवा
थरारते काया
पहाट प्रभाती
मनी देवराया. (1)
गार गार वारा
पहाटे गारवा
अंगणी पसरे
सुगंधी मरवा. (2)
पहाटे फिरता
धुक्याची दुलई
भान मला नसे
मनी गीत गाई. (3)
कांदे–पोहे चहा
व्यायाम नी योगा
आरोग्य उत्तम
थारा नसे रोगा. (4)
शेतात हुरडा
शेंगा हरबरा
सुगीचे दिवस
आनंदाचा झरा. (5)
ताजी ताजी फळे
हिरवी ती भाजी
भाकरी खाताना
घरदार राजी. (6)
थंडीचे दिवस
देवाचा तो वास
आरोग्यवर्धक
ऋतु असे खास. (7)
अंजली गरगटे.(पुणे)















