prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – बालगीत

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – बालगीत

0
82

काय करावे ह्या पालकांचे, काहीच कळत नाही ।
मुलांनाही लागते मदत हे त्यांच्या गावीही नाही ।।

तिचे काम, त्यांचा जॉब ह्यातच सगळे हरवून जातात।
अहो, आमचा अभ्यास, प्रोजेक्ट सगळे विसरतात ।।

आम्हाला ही टेन्शन असते हे त्यांच्या गावीही नाही।
काय करावे ह्या पालकांचे, काहीच कळत नाही।।

टिव्ही मालिका, बातम्या, मॅचेस महत्वाच्या असतात।
आम्ही मुलांसाठी मात्र कार्टून पाहणे होते दुरापास्त।।

आम्हालाही हवा असतो थोडासा ब्रेक हे ह्यांना कळत कसे नाही।
काय करावे ह्या पालकांचे तेच कळत नाही।।

मोबाईल शिवाय ह्यांचे श्वास अडकतात घशात ।
आम्ही घेतला हाती की नीतीचे पाठ सुरू होतात।।

मुलांनाही वेगवेगळे ऍप ज्ञानी करतात हे त्यांना उमजत नाही।
काय करावे ह्या पालकांचे तेच कळत नाही।।

जुन्याचा सोस तरीही नवनवीन आकर्षणे त्यांनाही भुलवतात।
आत्ताची पिढी वाया जातेय म्हणून शंख करतात ।।

अव्वल दर्जाची आधुनिक टेक्नॉलॉजी ह्यांच्या पचनी पडत नाही।
काय करावे ह्या पालकांचे खरंच काही कळत नाही।।

जुने ते सोने खरे जरीही, कालानुरूप चालावेच लागते।
उज्वल भारताची कर्तबगार पिढी म्हणून आम्हाकडे पहावेच लागते।।

नव्या जुन्याचे कौतुक करताना हे मात्र थकत नाहीत।
अशा आमच्या ह्या पालकांचे खरंच काय करावे ते कळत नाही।।

(स्वरचित)
©®नीला चित्रे
चिंचवड पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here