prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – बालगीत

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – बालगीत

0
82

जंगलात भरली
प्राण्यांची शाळा
जंगली प्राणी
झाले सारे गोळा

वाघाने काढले
एक फर्मान
अध्यक्ष सांगा
होणार कोण

सिंहाने केली
गुरगुर सुरु
घाबरून गेली
छोटीशी खारू

माकडाने मारली
उंच उंच उडी
अस्वलाने घेतली
हातात छडी

चतुर कोल्हा
बसला गप्प
शाळा सगळी
झाली ठप्प .

सौ.सुनंदा बाळासाहेब वाळुंज
ठाणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here