prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – बालगीत

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – बालगीत

0
73

मला वाटते विमान होऊन
भुर्रकन आजोळी जावे
आजीच्या गळ्यास बिलगुन
तिचा लाडोबा व्हावे

आजोबांच्या मिशी वरून
अलगद हात फिरवावा
त्यांच्या कोटाच्या खिशातील
सुकामेवा हळूच घ्यावा

मामा संगे सांज सकाळी
आमराईतून गात फिरावे
रानोमाळी फिरता फिरता
पाखरांशी हितगुज साधावे

करवंदीच्या जाळीमधून
काळीभोर करवंद खुडावी
जांभूळ बोरे आणिक चींचा
तळ्याकाठी बसुनी खावी

सायंकाळची शुभम करोती
आजी संगे बोलावी
आजोबांच्या चष्म्याशी
हळूच लुडबुड करावी

चुलीपाशी मामी संगे
हळूच गोष्टी कराव्या
तिच्या हातच्या पुरणपोळ्या
चवी चवीने खाव्या

आजीच्या गोष्टी ऐकत
निज डोळ्यावर यावी
स्वप्नांच्या दुनिये मधली
परी मजला भेटावी

सौ. वंदना शशिकांत पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here