
मंद मंद गारव्यानी
अंतरी चाहूल लागे
वाट पाहे प्रहरीची
अंथरूणात ऊबेची
थंड थंड गारव्र्यानी
शहारल माझं अंग
डोळ्यात तुझ्या मला
दिस थरथरले ओठ
हातात हात घालून
होतो स्पर्श गारव्यांचा
ऊब तुझ्याच स्पर्शाची
सूर्यांच्या किरणांचा
किलबिल पाखरांचा
घिरट्या घाली प्रहरी फांदीवर बसूनीया
आनंद घेती गारव्यांचा
कवी, उमराव चंफतराव नारनवरे
काटोल जिल्हा नागपुर















