
ऋतू हिवाळ्यात
कडाक्याची थंडी
धुक्यात भरली
रात हुडहुडी —!!
गारवा अंगाला
झोंबतोय फार
गुलाबी थंडीचा
धुंद वारा गार—!
शेकोटीची उब
गोळा होत सारे
वरुन धुक्याने
भोवताल वारे—!!
कडक थंडीचा
मौसम मजेचा
चहाचा तो कप
गरम शक्तीचा —!!
कोवळ्या उन्हात
अंगणात छान
किरणांची गर्मी
शाल परिधान —!!
सौ.सविता संजय भोयर
राजुरा















