
पहाट समयी पक्षी,
किलबिलती सारे
म्हणती अरुणोदय
दर्शना व्हा जागे-।१।
ऊंच भरारी थव्या- थव्यांनी
घेई गगनांत,
लक्ष्य गाठण्याअशी भरारी
ह्या जिवंनात-।२।
डोंगर माथा निळया नभी
सूर्य -चंद्र अगणित तारे,
सुचविती भेदभाव विसरुनी
सत्कार्या संगठित व्हारे-।३।
डौलदार झाड़े सिरवी
सन राही स्वागतास,
थकलेल्यांना म्हणती
ह्या विश्रांती पुणे जाण्यास-।४।
सृष्टीबहराया तिन्ही ऋतुंचे
साह्य अतिमोल,
मदत करीं गरजेला
ठेव स्नेह समतोल-।५।
बहारले मन माझे
निसर्ग बघतांना ,
नित्यनवी शिकवण देई
अविष्कार बघतांना-।६।
सौ.अनुराधा लक्ष्मण मारचट्टीवार
हैदराबाद तेलंगाना















