
नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – राज्याच्या सत्ताकारणात महायुतीच्या भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या त्रिकुटांनी राज्याच्या तिजोरीला लुटण्याच्या पलीकडे काहीच केले नाही, सामान्य जनतेची पिळवणूक करून राज्याला कर्जबाजारी केले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबतही महायुती सरकारने पाठ फिरवली आहे, अशा निष्ठुर सरकारचे चेले चपाट्यांनी मागील सत्ता काळात आरमोरी नगर परिषद येथे नगरसेवक म्हणून नाही तर कंत्राटदार म्हणून काम केले आणि प्रत्येक कामातून मलिदा लाटल्याने आज संपूर्ण आरमोरी शहराच्या विकासाला खीळ बसली आहे.
राज्यात महागाई व बेरोजगारी सर्वत्र फोपवलेली असून सर्वसामान्यांचे जगणे अवघड झाले आहे. खाण्याचे तेल, युरिया इतर खते, बियाणे, पेट्रोल व डिझेल यांचे भाव गगनाला भिडले आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या धानाला भाव देत नाही. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होत आहे, रस्त्यांची चाळण झाली आहे.

भाजपच्या कुठल्याही प्रलोभांना बळी न पडता येत्या २ डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसच्या पंजा चिन्हा समोरील बटण दाबून या मालिंदेखोरांना घराचा रस्ता दाखवा असे आवाहन केले.
या सभेस मार्गदर्शन करताना आ. रामदास मसराम म्हणाले की, आरमोरी शहरालगत मोठी नदी असतानाही नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही, ही शोकांतिका आहे. येथील नाल्या पूर्णतः कोंबल्या असून रस्ते रखडले आहेत. मागील 5 वर्षात सत्ताधाऱ्यांनी खिशे भरण्यापलीकडे काहीच केले नाही. आमच्या काँग्रेस उमेदवारांना निवडून दिल्यास शहरातील ज्वलंत पाणी समस्यांचे निराकरण, रामसागर तलावाचे सौंदर्यीकरण, मुख्य रस्त्यांचे नूतनीकरण, सुरळीत सांडपाणी नाल्या, पथदिवे अशा नागरिकांच्या मूलभूत सुविधा अत्यावशक गरजा पूर्ण करू तरी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी उपस्थित नागरिकांना केले.
या आयोजित सभेस गडचिरोली जिल्हा निवडणूक निरीक्षक संदेश चिंगलकर, जिल्हाध्यक्ष महेन्द्र ब्राम्हणवाडे, प्रसिद्ध व्याख्याते गोविंद पोलाद, सुधीर भातकुलकर, प्रकाश इटनकर, गंगाधर सोमकुवर, मिलिंद खोब्रागडे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रशांत (अप्पा) सोमकुवर, नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार, तालुका काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.















