
ज्ञानाचे कण वेचूनी
पुस्तक बनवले छान
माणसाला माणूस केले
असे ते महान संविधान।।
खरंच डॉ बाबासाहेब आंबेडकर नसते तर या देशाचा इतिहास काहीतरी वेगळाच राहिला असता.तीच घराणेशाही
तेच ब्राम्हण्यवादाचे वर्चस्व आणि होणारे परकीय आक्रमने यामुळे भारत अजूनही रसातळाला गेला असता.तीच गुलामगिरी तेच अमानुष अत्याचार,तीच लाचारी आपल्या वाट्याला आली असती.
माणूस माणूस न होता राक्षसीवृत्ती एकमेकांवर अन्याय करणारी प्रवृत्ती पुढेही खालच्या जातील सोसावी लागली असती.
भारतात इंग्रज आले आणि त्यांनी भारतात सुरत येते पहिली वखार स्थापन केले.हळूहळू त्यांनी आपला बिजनेस वाढवले आणि त्या सर्व भारतभर पसरले.भारतील सर्व सोने नाणे, भरमसाठ खनिज संपत्ती लुटून नेले. आणि भारतात मोठया प्रमाणात गुलामगिरी लादली. पण कधी कधी वाटते की इंग्रज भारत आले नसते तर कदाचित आपला विकास झाला नसतात लोकं शिकले नसते आणि गुलाम तो गुलाम राहिला असतात.पण म्हणतात ना की ईश्वर उकिरडयाची सुध्दा दैना फेडत असतो. डॉ.बाबासाहेब आंबेडकर , छत्रपती शिवाजी महाराज, म.फुले, शाहु महाराज असे असे नेते नसते तर भारत आज वेगळ्या दिशेने जात राहिला असता, आणि हे सर्व वाचवण्यासाठी भारतीय युगपुरुष विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर या महामावाचा जन्म झाला आणि त्यांनी सर्व गुलामीच्या बेड्या तोडून सर्व मानवाला मुक्त केले.
ज्या बाबासाहेब आंबेडकरांना शिकण्यासाठी पुस्तक दिले जात नव्हते त्याच बाबासाहेबांनी असे एक पुस्तक लिहिले,की त्याच पुस्तकावर भारत देश चालतो.ते म्हणजे भारतीय संविधान।।
यात सुरुवातिला 389
सदस्यांपैकी 299 सदस्यांनी1082 दिवसांनी म्हणजे 2वर्षे11 महिने18दिवस दिवसांत जवळपास12000 पानांचे महान संविधान लिहिले
भारतीय संविधानात एक प्रास्ताविका ,8अनुसूची,25भाग ,
आणि395 कलमे होती.आता भारताच्या घटनेत 1प्रास्ताविका ,12 अनुसूची,25भाग,448कलमे,5परिशिष्ट आहेत,
आणि असे संविधान लिहिण्यासाठी 254दौत, 303 पेन वापरण्यात आहे, आणि असे महान संविधान तयार झाले.
देशातील नागरिकामध्ये सांविधानिक मूल्यबद्दल आदराची भावना वाढवणे हाच उद्देश आहे,भारतातील विविध जाती धर्म आणि करोडो लोकसंख्येचा एक देश म्हणून एकत्रित करणारी ही राज्यघटना आहे तिचा गौरव करण्यासाठी आपण हा दिवस साजरा करतो, त्यामुळे लोकांना संविधान दिन म्हणजे काय ते कळते. आजकाल तर सर्वच शाळेत संविधान दिन विविध उपक्रम राबवून साजरा केला जात आहे, जसे की संविधान रॅली, भाषण, काव्य वाचन, निबंध स्पर्धा पथनाट्य असे विविध उपक्रम राबवून संविधान जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे
कारण प्रत्येक नागरीकाला समान अधिकाराने जीवन जगता आले पाहिजे.म्हणून म्हणावेसे वाटते की,
करू जागर संविधानाचा
आपल्याच त्या हक्काचा
संविधानानेच उद्धार होईल
आपल्या या मानव जातीचा।।
।।जय भीम, जय संविधान।।
जय महाराष्ट्र
प्रा. समिंदर निवृत्तीराव शिंदे
लातूर















