
हा ग्रंथ नव्हे, भारताची प्रतिज्ञा.
बाबासाहेबांची अमूल्य भेट.
समानतेचे बीज पेरले,
आज वटवृक्ष होऊन उभे.
तो आत्मा आहे विविध देशाचा,
प्रत्येक नागरिक एक महत्त्वाची कडी.
जाती-धर्माच्या भिंती पाडल्या,
न्याय-बंधुतेचा मार्ग दाखवला.
शोषितांना मिळाला आवाज,
स्त्री-पुरुषांना समान स्थान.
स्वातंत्र्याची पहाट झाली, अधिकार आले.
अंधाऱ्यात ज्ञानाची मशाल मिळाली.
हे संविधान फक्त कायदे सांगत नाही,
कर्तव्य-जबाबदारी शिकवते.
धर्मनिरपेक्षता हा मूलमंत्र,
एकतेची भावना रुजवते.
लोकशाहीचा आधार आहे हा,
ज्यावर भविष्य भक्कम उभे.
या ग्रंथातील प्रत्येक शब्द मोलाचा,
तो विचारांनी सिंचला गेला.
आपले राष्ट्रीय चरित्र यातच,
स्वाभिमानाने जगायला शिकवले.
या महान वारशाचा सन्मान करणे,
हेच खरे राष्ट्रप्रेम आहे.
नियमांचे पालन करू निष्ठापूर्वक,
संविधानाची शान राखू.
संविधानाच्या प्रकाशात देश पुढे नेऊ, हाच आमचा दृढ संकल्प.
प्रा.राजश्री पाटील
सुरत















