prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – सन्मान संविधानाचा

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – सन्मान संविधानाचा

0
125

भारतीय संविधान आले जन्मास
बाबासाहेब आंबेडकर त्याचे जनक
समता बंधुता एकता संगम खास

घेऊन कायद्याचे शिक्षण
बाबासाहेब जाहले सुजाण
समानतेचे रक्षण करण्या
लिहीले मनापासून संविधान

जातीभेद निर्मूलन केले
स्त्री स्वातंत्र्य जपले
शिक्षणाचे अधिकार दिले
अबलेस सबला बनवले

भारतीय नागरिकत्वाचा मान
जपून दिधला तयांना सन्मान
अमलात आणले संविधान
रक्षण हक्काचे मनापासून

भारतीय घटनेचे शिल्पकार
ते बाबासाहेब आंबेडकर
तूच एक तारणहार
किती मानू तुझे उपकार

(स्वरचित)
©® नीला चित्रे
चिंचवड पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here