
बलाढ्य भारत देशातील
लोकशाहीला आत्मा भेटला,
भारतीय संविधान घटनेतून
एकात्मतेचा नारा गुंजला …!!१!!
सर्वधर्मसमभाव हे ब्रीदवाक्य
भारतीय संविधानात पाहिले,
आम्हीं सगळे भारताचे लोक
हे प्रथमतः प्रस्तावनेत वाचले…!!२!!
विविधता संस्कृतीची अखंडता
एकत्रित जोडतांना घटनेत पाहिला,
जातीधर्माचे अवडंबर सारे सारून
एकात्मतेचा पाया रुजवत राहिला..!!३!!
न्याय समता बंधुता स्वातंत्र्य
नीतिमूल्ये जोपासना कलमात,
भारतीय लोकांच्या हितासाठी
संविधान २६ नोंहेबरला अमलात…!!४!!
जगात होई बलशाली भारत
लोकशाहीचा करता पुरस्कार,
भारतीय संविधान जगण्याचा
देशाला देई खराखुरा अधिकार…!!५!!
कवीनंदेय…
वांद्रे, मुंबई















