
कागदावर कोरले
पेनाच्या त्याच टोकाने
व्यथा त्याच टिपले
संविधानात रचले…(१)
शोशना विरूद्ध लढा
दिला बाबासाहेबानी
कोरले शिल्प मनात
कायदा संविधानात…(२)
संविधानाचा सन्मान
करावेत मानवाने
लोकशाही भारताची
सर्व धर्म एक सन्मान…(३)
गुणवंत बहुजनास
नव्ह्ता हक्क शिक्षणाचा
संघर्ष माझ्या भिमाचा
मार्ग मिळाला बहुजनास…(४)
जात धर्म छूवाशूत
असे मानवा मानवात
शोधून पहा मानवात
जातीचा रंग अंगात…(५)
संविधानाचे शिल्पकार
सर्व जगात महान
स्वातंत्र्याचे अधिकार
भारत देश महान…(६)
कवी उमराव चंफतराव नारनवरे
काटोल जिल्हा नागपुर















