
भारतीय संविधान
आत्मा आहे देशाचा
न्याय स्वातंत्र्य समता
मंत्र लोकशाहीचा
भारतीय संविधान
माणूसपण घडवतो
प्रत्येकाचे अधिकार
समानतेने जपतो
धर्म भाषा जातीपलीकडे
जपावी विचारांची पवित्रता
बाबासाहेबांच्या कार्यामुळे
सुरक्षित राहील नीतिमत्ता
महामानवाचे उपकार
मिळाले श्रेष्ठ संविधान
प्रेरणादायी विचारांचा
करूया सर्व सन्मान
अधिकाराचे भान राखून
जबाबदारीने वागावे
संविधान भारताची शान
तन-मन-धन अर्पावे
डॉ. स्मिता गजभिये/ तिरपुडे
लाखनी, जिल्हा.भंडारा















