
राजुरा – चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार मा. सुभाष धोटे यांनी आज जिल्हा परिषद राजुरा येथील बूथ क्रमांक १ वर आपल्या अमूल्य मतदानाचा हक्क बजावत लोकशाही बळकट करण्याचा संदेश दिला.
यावेळी भारतीय संविधानाच्या संरक्षणासाठी, लोकशाहीला मजबुती देण्यासाठी आणि राजुरा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राजुरा शहरातील सर्व मतदार बांधव–भगिनींनी मोठ्या उत्साहाने पुढे येऊन मतदान करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच चंद्रपूर जिल्ह्य़ातील सर्व नागरिकांनी सुध्दा आपले मतदान करावे असे आवाहन केले.
या प्रसंगी राजुरा नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष मा. सुनीलभाऊ देशपांडे उपस्थित होते. त्यांनी सुद्धा येथील बुथ क्रमांक २ वर आपला मतदानाचा हक्क बजावला.















