
प्रशांत रामटेके मुख्य संपादक प्रबोधिनी न्युज – कळमगाव ग्रामीण फुले शाहू आंबेडकर विचारमंच तथा नगर बौद्ध पंच कमेटी कळमगाव गन्ना यांच्या वतीने संविधान सन्मान दिन समोरोह तथा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले स्मृतीदिन सोहळ्याचे आयोजन दिनांक ३०/११/२०२५ ला चार सत्रात आयोजन करण्यात आले होते.
पहिल्या सत्रात संविधान सन्मान दिन रॉली व समता सैनिक दलाचे पत संचलन व सोबत रॅली दरम्यान स्वरविहान म्युझिकल गृप इवेन्ट वडसा यांचा बुद्ध भिम गिताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
दुसऱ्या सत्रात संविधान सन्मान दिन तथा माहात्मा ज्योतीबा फुले स्मृतीदिनानिमित्त मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष आद बाबुराव गेडाम हे होते तर मुख्य मार्गदर्शक डॉ राजपाल खोब्रागडे अध्यक्ष भारतीय बौध्दमाहासभा चंद्रपूर जिल्हा पुर्व तर प्रमुख अतिथी म्हणून आद प्रा प्रताप नगराळे, आद दिपक मोटघरे, आद कालुराम चाहदे, आद प्रा जगदीश सेमसकर सरचिटणीस, आद अशोक खोब्रागडे, आद मुकेश बन्सोड, आद गेदबाजी खोब्रागडे उपस्थित होते त्यानिमित्ताने सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या मान्यवरांचे सत्कार करण्यात आला.
आद इजि सुदाम खोब्रागडे, आद बलदेव चाहदे, आद भोयर, आद दिनकर दांडेकर यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक डॉ राजपाल खोब्रागडे यांनी या देशातील तमाम नागरिकांना मुलभूत अधिकार देऊन संविधान कसे उपयुक्त आहे असे समजून सांगितले.
तिसऱ्या सत्रात प्रबोधनात्मक कार्यक्रम जागर संविधानाचा सादर कर्ते राष्ट्रीय कार्यकर्ते सुप्रसिद्ध सप्त खंजेरी वादक राष्ट्रीय किर्तनकार मा सत्येपाल माहाराज आणि संच यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष आद सचिन गणवीर तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रभुदास चौधरी, आद मालता अगळे सरपंच आद सुषमा धारणे सरपंच विसापूर आद दिक्षा पाटील सरपंच लोहारा अशोक खोब्रागडे, मुकेश बन्सोड अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी सिन्देवाही महेंद्र कोवले जिल्हा उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी आद वैभव उसगावकर आद कीशोर शेंडे आद उद्धव पेंदाम उपस्थित होते कार्यक्रम बघण्यासाठी विस ते पंचेविस गावातील लोक उपस्थित होते.















