
महाराष्ट्र राज्य क्रीडामहोत्सव 2025
रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या वतीने आयोजित महाराष्ट्र राज्य क्रीडामहोत्सव 2025 मध्ये विविध स्पर्धांसाठी कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक यांच्या संघात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
खो-खो मध्ये कुंजन प्रभाकर तोंडरे आणि कबड्डी मध्ये भूषण सुरेश तुपटे या दोन विद्यार्थ्यांची निवड झालेली असून 4 ते 9 डिसेंबर 2025 दरम्यान होणारे क्रीडा महोत्सवात ते कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे प्रतिनिधित्व करणार आहेत या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, संचालक मंडळ, प्राचार्य, सर्व शिक्षक वृंद, तसेच पालक वर्गाकडून या विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.















