
नांदेड : समाजातील समतेचा संदेश घराघरांत पोहोचविण्यासाठी कार्यरत असलेल्या समता सैनिक दलाला आज औपचारिकरित्या ड्रेस वाटप करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे इंजि. प्रशांत इंगोले यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजली आंबेडकर यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमादरम्यान दलाच्या ध्येय, निष्ठा आणि सामाजिक योगदानाचा गौरवपूर्वक उल्लेख करण्यात आला.
यावेळी समता सैनिक दलाचे मेजर सुरेश गजभारे, कृष्णा गजभारे तसेच सैनिक दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमात बोलताना अंजलीताई आंबेडकर म्हणाल्या की, “समता सैनिक दल हे बहुजनांच्या सुरक्षेचे, अभिमानाचे आणि सामाजिक हक्कांचे रणांगणातील शिलेदार आहेत. समानतेसाठीच्या संघर्षात हे सैनिक आमची ताकद आहेत. संविधान, मानवता आणि समता यासाठी लढणाऱ्या प्रत्येक सैनिकाला वंचित बहुजन आघाडीचा ठाम पाठिंबा आहे.”
दलातील सैनिकांनी संविधानिक मुल्यांच्या रक्षणासाठी आणि आंबेडकरी चळवळीच्या विस्तारासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची शपथ घेतली.















