
चंदनाची चिंता
झोपला पिता
प्रवास ज्ञान सूर्याचा
संपला आता
किती वर्षांनी डोळा लागला
निजला भीम माझा
शांत निजला……
महापरिनिर्वाण “अंतिम निर्वाण” ६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांचे दिल्ली येथे राहत्या घरी रात्री झोपेतच निधन झाले. निधनापूर्वी रात्री “बुद्ध आणि त्यांचा धम्म” या पुस्तकाचा शेवट करुन झोपले ते…. अंतिमच…. ज्या पेनाने आयुष्यभर अन्याया विरुध्दच्या अनेक लढाया जिकल्या, संविधान सारखा पवित्र ग्रंथ लिहिणारा तो पेन शोषित पिडीत दलितांना वरदान ठरलेला तो हात… अंतिम सत्य लिहून कायमचा विसवला होता….
पहाटे डॉ. बाबासाहेब यांच्या निधनाची वार्ता अत्यंत सुसाट वेगाने भारतभर पसरली. शोषित, पिडीत दलित अस्पृश समाज शोक सागरात बुडाला होता…
अश्रुंचा पूर… वाहत होता… ज्ञानाचा सुर्य अस्ताला गेला होता..
डॉ. बाबासाहेब यांना देह दिल्ली हुन मुंबई येथे आणला गेला दादर चैत्य भूमी येथे… अफाट जनसागर लोटला होता…. उफानता महासागर देखील नतमस्तक होऊन अभिवादन करीत केले….
इतिहास साक्ष आहे.
डॉ. बाबासाहेब एक असे धरोहर (वारसा) ज्यांच्या निधनाने १९३ देशांनी आपला राष्ट्रीय ध्वज त्यांच्या मान वंदनेला खाली घेतला होता…
२५ लाखाहून अधिक जनसमुदाय या महामानवाच्या अंतिम दर्शनाला लोटला होता… आपल्या पित्याचे अंतिम दर्शन घेऊन… व्याकुळतेने परतला होता..
नऊ कोटींचा प्रकाश गेला
झाली जीवाची लाही
भीमा पाठी या जगात आता वाली उरला नाहीं… ही भावना अनावर झाली होती… अवघा समाज पोरका झाला होता…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापारिनिर्वाण
१९४८ पासून आंबेडकरांना मधुमेह होता, औषधाच्या दुष्परिणाम मुळे दृष्टी कमी झाल्यामुळे ते जून ते ऑक्टोबर १९५४ पर्यत अंथरूनां वरच होते. १९५५ मध्ये त्यांची प्रकृती अजून बिकट झाली. ” द बुद्ध अँड हिज धम्म ” हे त्यांचे अंतिम हस्तलिखित पुस्तक पूर्ण केल्यानंतर तीन दिवसांनी ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली तील राहत्या घरी रात्री झोपेतच निधन झाले….
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समाजातील जाती – आधारित असामानतेचे स्पष्ट विरोधक होते, दलितांनी एकत्र येऊन त्यांचे हक्क मागावेत यासाठी ते आग्रही होते. अस्पृश्यता आणि इतर प्रकारच्या सामाजिक असामानतेचा अंत करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. दलित आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या हक्कासाठी लढा दिला..
“शिका, संघटित व्हा, व संघर्ष करा हा मुलमंत्र दिला.”
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्वोत्तम वाक्य – ” मला तो धर्म आवडतो जो स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता शिकवतो. मनाची लागवड (जोपासना) करणे हे मानवी अस्तित्वाचे आमटीम ध्येय असले पाहिजे… ”
धर्म जाती, उच्च नीच, स्पृश – अस्पृश्य च्या नावाने सनातन धर्म (?) नावाच्या खाली मिळालेली,हिणविलेली वागणूक बाबासाहेबांच्या अत्यंत जिव्हारी लागली होती…..
म्हणून ते उदवेगाने म्हणतात…
“धर्म बनाया लुटने के लिए, जातीया बनाई बाटने के लिए, और भगवान बनाया इन्सान को डराने के लिए…
स्वतःचे कुटुंब, संसार, मुले, पत्नी एवढंच नाहीतर स्वतःची तब्बेत याकडे सुद्धा त्यांनी दुर्लक्ष केले… आयुष्याचा प्रत्येक क्षण त्यांनी समाजासाठी, समाजाला जागे करण्यासाठी घालवला….
डॉ. बाबासाहेबाना अजून आयुष्य मिळाले असते तर त्यांनी त्यांचे अपूर्ण राहिलेले कार्य नक्कीच पूर्ण केले असते…
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक महत्वाची व आदर्श वत काम केली असली तरी त्यांचे अनेक कार्य राहीली आहेत.
सामाजिक समानता आणि न्यायाची पूर्ण अंमलबजावणी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पूर्ण तोडगा काढणे आणि दलित व महिलांच्या हक्काचे संपूर्ण संरक्षण, बौद्ध धर्माचा (धम्माचा) प्रसार..
बौद्ध धम्म स्वीकारण्यास प्रेरित केले, पण पूर्णपणे बौद्धमय समाज निर्माण करण्याचे त्यांचे कार्य अजूनही सुरू आहे….
डॉ. बाबासाहेब यांचा अंतिम संदेश..
नानकचंद माझ्या लोकांना सांग की जे मी केले आहे ते मी अत्यन्त हाल अपेष्टा सोसून आणि आयुष्यभर दुःख भोगून आणि माझ्या विरोधकांशी लढून मिळविले आहे महतप्रयासने हा काफीला जिथे दिसतो तिथे आणून ठेवला आहे.
मार्गात कितीही संकटे आणि अडचणी आल्यातरी तो काफीला पुढे येत नसेल तर त्यांनी तो तिथेच ठेवावा. पण काही झाले तरी तो मागे नेता कामा नये. हाच माझ्या लोकांना माझा संदेश आहे…
बाबासाहेबांनी इथवर ओढून आणलेला गाडा शिक्षित, उच्च शिक्षित, नोकरदार यांनी तो पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपल्या खांदयावर घेऊन समाजाला योग्य दिशा, मार्गदर्शन करावे… बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यात हातभार लावावा हिच खरी श्रद्धांजली … सार्थ ठरेलं…
महासागराच्या तिरावर विसावलेले बाबासाहेब ६ डिसेंबर ला उसळनाऱ्या लाटा मार्फत जनसमुदयाला हेच तर सांगत नाहीं ना… तुम्ही शिकलात पण संघटित नाही झालात.. संघर्ष करताय पण दिशा नाहीं संघर्षाला…. म्हणून मी आज ही खवळतोय… लाटा लाटातून किनारी येऊन आदळतोय… माझ्यासाठी एकवटलेला समाज न्याय हक्क साठी एका छताखाली कधी येईल….
ज्या दिवशी सारा समाज एकत्र येईल त्याच दिवशी खरे तर बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली अर्पण होईल…
तुम्ही पंखाना बळ दिलेल्या या पाखराची ही मान वंदना स्वीकारावी.
महामानवास विनम्र अभिवादन
सुनंदा निकम
धुळे














