
विषमतेच्या अग्निदिव्यातून तावून सुलाखून निघालेलं एक तेजस्वी, विजयी, स्वयंभू, बुद्धीमान,, कतृत्ववान, थोर विचारवंत, जनकल्याणकारी, राष्टहितकारी, निस्वार्थ त्याग समर्पणाची भावना असलेले व्यक्तीमत्व म्हणजे महामानव बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर ……
जगात ज्या प्रकारच्या सदगुणसंप्पन्नतेमुळे मानव ” महामानव “म्हणून सिद्ध होऊ शकतो, त्या सदगुणसंप्पन्नते मुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानव म्हणून सिध्द होऊ शकले आहेत , डॉ बाबासाहेब आंबेडकर, अत्यंत स्वाभिमानी नेता होते. हा स्वाभीमान त्यांना शोभून दिसणारा रत्नजडित अलंकार होता. तो स्वाभिमान त्याच्या श्रेष्ठ व्यक्तीमत्वाचा प्रमुख आधार होता, त्यांचे धैर्य त्यांच्या स्वाभीमानाचेच एक
अंगभूत भूषण होते. त्यांचा स्पष्ट वक्तेपणा त्यांच्या
स्वाभीमानाचाच एक दागिना होता. त्यांच्या स्वाभिमानात
मोहक सुंदरपणा होता, त्यांची अपार विद्वता त्यांच्या स्वाभीमानाची प्रभावशाली शोभा होती. त्यांचे अगाध ज्ञान त्यांच्या स्वाभिमानाचे अत्यंत परिणामकारक अमोघ साधन होते त्यांचे संस्मरणीय असे जनहितकारी , देशहितकारी कतृत्व त्यांच्या स्वाभिमानाचे मधूर फलित होते.
कोणत्याही कृतीच्या मुळाशी असलेला त्यांचा दृढ आत्मविश्वास त्यांच्या स्वाभिमानाचा प्राण होता आपण स्वतः विचारपूर्वक निश्चित केलेल्या मार्गानेच पुढे जात राहण्याचा त्यांचा स्वतंत्र बाना होता, समोर कोणी कितीही मोठा असला. तरी सुद्धा त्यांच्याशी ताठ मानेनेच स्वसन्मानदर्शक व्यवहार करण्याचा त्यांचा गुण त्यांच्या स्वाभिमानाचा अविभाज्य भाग होता. आपल्या अशा प्रकारच्या स्वाभिमानामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर आपल्या अस्पृश्योद्वाराच्या जिवित कार्यात आणि कोणत्याही महत्त्व पुर्ण कार्यात यशस्वी होत राहिले. त्यांनी अस्पृश्य समाजावरच नव्हे तर सर्व जाती धर्मासाठी व सर्व धर्मातील स्त्रीया साठी त्यांनी अतुलनीय व मोलाचे कार्य केले आहे.
त्यानी सर्व धर्मासाठी समता, बंधुता, एकात्मता रुजविली
व सर्व धर्मसमभाव या उद्देशाने देशाला अनमोल असे संविधान देवून मानवी हक्क अधिकाराची नवी दिशा दिली.म्हणूनच ते आपल्या शिलसंप्पन व उध्दार
व्यक्तीमत्वामुळे स्वाभिमानामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर भारत मातेचे महान सुपुत्र झाले, भारतरत्न झाले, बहूजन शोषित पिडीताचे भाग्यविधाता झाले. म्हणूनच अस्पृश्याचे परमपूज्य बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर वंदनीय झाले.
सोमवार दि. ३ एप्रिल १९५६ रोजी, बाबासाहेबानी जे काही लिहिले होते, ते सायंकाळी नानकचंद कडून टाईप करून घेतले , त्यानंतर लगेच नानकचंदास बरोबर घेऊन बाबासाहेब आंबेडकर आपल्या आजारी असलेल्या माळ्याला भेटण्यास त्यांच्या राहण्याच्या खोलीवर गेले, त्यांना पाहून आजारी माळ्याच्या डोळ्यात अश्रू आले, तो दाटलेल्या कंठाने म्हणू लागला “आज प्रत्यक्ष भगवान माझ्या घरी आला. ” त्यांनी आपल्या दोन्ही हातांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा हात पकडला आणि तो हात आपल्या कंपाळाला लावला.
“रडत रडत बोलू लागला, “मला मृत्युच्या अगोदर प्रत्यक्ष
भगवानाचे दर्शन झाले . हे माझे भाग्य आहे .
डॉ बाबासाहेब आंबेडकर त्या माळ्याला समजावत म्हणाले, अरे रडू नकोस! औषधोपचार कर ! मी औषध पाठवून देतो.
मुत्यु टाळता येत नाही . पण औषधोपचाराने थोडा आराम मिळतो. व काही काळ तो पुढेही ढकलता येतो. मुत्युला एवढं का भितोस ? अरे सर्वाना कधीतरी मरायचेच आहे.
मलाही मरायचेच आहे, मरण कोणाला चुकवता येत नाही.
तु शांत हो,आणि मी पाठवतो ते औषध घे. ” अशा प्रकारे
माळ्याला धिर देऊन अन् समजावून ते परतले. त्यानी
माळ्याला लागणारं औषधे मागवून घेऊन माळ्याला पोचती केली. ३ डिसेंबर १९५६रोजी माळ्याला समजावताना व धिर देताना डॉ बाबासाहेब आंबेडकर “सर्वाना कधीतरी मरायचेच आहे मरण कोणाला चुकवता येत नाही. ”
असे का म्हणाले , ते विचार करण्यासारखे आहे. त्याना
आपल्या जवळ येत असलेल्या मुत्युची चाहूल तर लागली
नसेल, ना…..? आणि अवघ्या तिन दिवसानी बाबासाहेब यांचे महापरिनिर्वाण.
बुद्ध आणि त्यांचा धम्म हे त्यांचे अंतिम हस्तलिखित पुर्ण
केल्यानंतर तिन दिवसानी तो दिवस म्हणजे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी झोपेतच काळाने घेरले . त्यांच्या वर ७ डिसेंबर १९५६ रोजी चैत्यभूमी मुंबई येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यावर काही दिवसातच निधन झाल्यामुळे त्यांच्या पुण्यतिथीला “महापरिनिर्वाण ” किंवा ” महाप्रयान ” दिन असे म्हटले जाते. बाबासाहेब यांची लाखो जनसमुदायात अंत यात्रा निघाली. संपूर्ण देश दु :खाच्या शोकसागरात ढवळून निघाला दिन दुबळ्या, अस्पृश्य बहुजनाचा नेत,थोर विचारवंत,तत्वज्ञानी
निस्वार्थी त्यागाची समर्पण भावना जपणारं एक व्यक्तीमत्व व राष्टहितासाठी चमचमणारा तारा नजरे आड झाला.
अशा कतृत्ववान,युगपुरुष ,महामानव ,भारत रत्न बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महाप्रयान दिनानिमित्त त्यांच्या स्मृतीत विनम्र अभिवादन……
दिनासाठी कष्ट साहिले माझ्या भीमाने
हक्क दिले मिळवून आम्हा अती श्रमाने
सोडुनी गेली गाई आपल्या या वासरा
“अरे सागरा भीम माझा येथे निजला शांत हो जरा ”
नंदा भगत /कारंजा लाड
वाशिम














