prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच साहित्य समूह तर्फे विशेष कविता अश्रू पडती चैत्यभूमीवर

प्रबोधिनी मंच साहित्य समूह तर्फे विशेष कविता अश्रू पडती चैत्यभूमीवर

0
99

अश्रू पडती चैत्यभूमीवर
उसळून आला जणसागर
भेट घेण्यास भीमरावाची
अग्नी पेटला तो समुद्रावर।।१।।

चंदनाची शया होती
भीमराव तेथे झोपले
धरती आणिआकाश
जणू आता कसे पेटले।।२।।

गिळून घेतला हुंदका
अश्रू ढाळत राहिले
झोपले होते भीमबाबा
ते साऱ्यांनी पाहिले।।३।।

खुप सोसले कष्ट त्यांनी
नाही जगले स्वतःसाठी
सर्व जीवनच अर्पण केले
मानवाच्या कल्याणासाठी।।४।।

नव्हता कुठे समान धर्म
जिवंत नव्हती माणुसकी
दिवस रात्र काम करून
आपला समाज राहायचा उपाशी।।५।।

घेतले भिमरावांनी शिक्षण
सर्व धर्माचा अभ्यास केले
माणसाला माणसात आणेल
बौद्ध धम्म त्यांनी स्वीकारले।।६

तोडून जाती पातीचे बंधन
अशी ठोकली त्यांनी मेक
लिहिले महान असे संविधान
सर्वच समाज झाला एक।।७।।

बाबा तुमचे स्वप्नं पहा
आता खरोखर सत्यात आले
समान झाली मानव जात
त्यात आम्ही तुम्हाला पाहिले।।८।।

फिरून यावे बाबा तुम्ही
तुमचेच होईल अभिनंदन
आमचे अश्रू अनावर झाले
तुमच्या चरणावर त्रिवार वंदन।।

प्रा. समिंदर निवृत्तीराव शिंदे, लातूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here