Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – ६. डिसेंबर महामानव...

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – ६. डिसेंबर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाण दिन 

0
126

सहा डिसेंबर निर्वाणदिन
माझ्या भिमरावाचा
संविधानाचा बाप माझा
नेता दिनदुबळ्यांचा

जातीभेद नष्ट केला
हाती घेतली लेखणी
सोबतीला होती माता
रमाई ती देखणी.

न्याय समता बंधुता
संविधानात लिहीले
जुनाट रुढींच्या जोखडातुन
समाजाला मुक्त केले

ऋण त्यांचे जनतेवर
आहे खुप मोठे
दलितांना मोकळे केले
पाण्याचे साठे.

सौ. सुनंदा बाळासाहेब वाळुंज, ठाणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here