
आयुष्याच्या वाटेवरती
जीवनगाणे नित्य गावे
दुःखाचे सांत्वन करूनी
मुखावरी सदा हसू फुलावे।।1।।
हर घडीचा डाव वेगळा
नियती खेळ कुणाना चुकला
घेऊन बसता दुःख कवेत
आयुष्याला खराच मुकला।।2।।
सगळे सोबत कामापुरते
मतलबानी भरली दुनिया
कठीण समय येता जीवनी
वाट शोधती दूर पळाया।।3।।
असे जगावे जीवनामध्ये
कर्तुत्वाचा ठसा उमटावा
कितीही पडले कष्ट तरी
सत्य मार्ग कधीना सोडावा।।4।।
सर्वांच्याच जीवनी येते
सुखदुःखाची एक तरी लाट
जीवन संघर्ष पेलत पेलत
चालावी लागते जीवन वाट।।5।।
सौ. यादव उज्ज्वला राजेंद्र
हडपसर, पुणे.















