
विश्व माझे माझ्या परी विश्वासाने जगतो आजही
संघर्षाला तोंड देत बछड्यांना जगविण्याची ग्वाही
मी सांगण्या जरी अबला, आहे आत्मनिर्भर
आयुष्याच्या जिवन संघर्षात ना शासकिय बळ
विधवा, घटस्फोटित, देवदाशी माझी जन्म कहानी
एकल जगणे स्त्री जिवन, मनुवृती रित असे जुनी
जिवन जगणे माझे समाजाने केले मुश्किल
स्वबळावर जगतो तरीही, काल्पनिकतेची खिळ
ज्ञानापासून वंचित,मुख्य प्रवाहापासून दूर
स्त्री तत्वाची जाणिव असलेली आजही चिंतातूर
कठपुतळी बनून जगणे , होवून पुरूषा हातचे खेळणे
घर संसारात हातभार, त्याच्याच मन विचारात रूळणे
चातुर्य, कौशल्य, क्षमता शक्ती माझ्या अंगीकारते
तरीही गुलामीची जाणिव देवून का धर्म जाती छळते
संविधानाच्या कोड बिलाने आज संरक्षण दिले
स्त्री अस्तित्वाच्या स्वातंत्र्याचे सोणे इथे झाले
शिक्षणात गरूड झेप, एकविसाव्या शतकात रूळते
प्रत्येक क्षेत्रात पादाक्रांत, परंपरा रूळीत खिळते
जिजाऊ सावित्रीची लेक मी सांगतो सन्मानाने
कर्मकांड पुजाअर्चेत रूळतो मी अस्सल धर्माचे नाणे
नंदा भगत
कारंजा लाड, वाशिम














