prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूहतर्फे विशेष कविता – जीवन

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूहतर्फे विशेष कविता – जीवन

0
89

आयुष्य झाले धकाधकीचे
जवा येवढे आहे हर्ष
पदोपदीच्या संकटांनी
जीवन जगताना आहे संघर्ष…

गरीबाच्या कष्टाने
राब राब आहे संसारी
कष्टकरी शेतकरी दादा
हवामान सध्या आहे विखारी..

शिक्षण झाले आहे महाग
जमाना तंत्रज्ञानाचा
फी भरणे ही झाले अवघड
संघर्ष चालू आहे जगण्याचा…..

उच्च शिक्षण घेऊनी
वाट पाहतो नोकरीची
प्रत्येक ठिकाणी पेपर फुटी
घायमेळ जणू चातकाची…..

जगण्याच्या शर्यतीत
षंड माजलेत फार
सगळे कस्पटाप्रमाणे
उन्माद शाहीचा झाला आहे कहर.

गायकवाड मनोज रामचंद्र शहापूर जिल्हा ठाणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here