prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – बंधन

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – बंधन

0
125

बंदीस्त रहाते मी
विचारांच्या चौकटीत
घाबरते मन माझे
रहाते घुसमटत ||१||

समाजाची बंधने
येत नाही मोडता
जरी वाटे उन्मुक्त
होऊन अंबरी विहरता ||२||

एकवार वाटे मज
तोडाव्या सर्व बेड्या
उंच उंच आभाळात
उडवत फिरावे गाड्या ||३||

स्वैर विहार, मुक्त श्वास
घेता जीवन सुखावतो
कितीदा वाटले तरी
प्रत्यक्षात पाय अडतो ||४||

शेवटी चौकट विचारांची
येते नेहमीच आडवी
समाजात बंदीस्त राहून
जगण्याची मौज घ्यावी ||५||

(स्वरचित)
©® नीला चित्रे
चिंचवड पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here