
जीवनाच्या वाटेवरती नवीन हास्यफुले ही उमलली
्कळलेच नाही बालपण जाऊन तरुणायी कधी आली
बघता,बघता, जगता जगता जीवनाची गाडी पुढे ढकलली,
तरुणाईतली स्वप्ने पूर्ण करता करता जबाबदारीची ओझी जीवनी आली,
आणि पुन्हा एकदा जिवणाची गाडी पुढे ढकलली,
बघता,बघता जीवनामध्ये काय केले काय नाही केले
याची उणीव पुन्हा मणी आली.
मानवी जीवनातील प्रवासाची वेळ ही आहे प्रत्येकाची ठरली
नशीब आहे आपुले
मानवी जीवन हे लाभले
सुख असो वा दुख असो माणसाला जीवनातील प्रत्येक भाषा ती कळली
मोह नाही लोभ नाही मणी
जीवनातील अंत यात्रा ही आहे ठरली
हसत खेळत गेले जीवन
पण आयुष्य भर केली ती धडपड
कशासाठी ही कल्पनाच मज या जन्मी नाही कळली..
कुमुद फुलझेले, नागपूर















