prabodhini news logo
Home गडचिरोली बानय्या जनगाम यांची जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारी अध्यक्षपदी निवड

बानय्या जनगाम यांची जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारी अध्यक्षपदी निवड

0
105

सिरोंचा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – सिरोंचा तालुक्यातील अविसंचे तालुका अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते बानय्या जनगाम यांची गडचिरोली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

अहेरीचे आमदार तथा माजी कॅबिनेट मंत्री मा. डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले.बानय्या जनगाम यांच्या सामाजिक, राजकीय कार्याची दखल घेवून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गट पक्ष्याने त्यांची गडचिरोली जिल्हा कार्यकारी अध्यक्षपदी म्हणून निवड करण्यात आली. आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार तथा माजी कॅबिनेट मंत्री डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या आदेशाने गडचिरोली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्याचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस (अप)गट जिल्हा अध्यक्ष रवींद्र वासेकर यांच्या हस्ते जनगाम यांना देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्येयधोरणे तळागाळातील लोकांपर्यत पोहचवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी याचा पक्षाला निश्चितच फायदा होईल.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस गडचिरोली जिल्हा अध्यक्ष रवींद्र वासेकर, गडचिरोली जिल्हा कार्याध्यक्ष नंदुभाऊ नरोटे आदींची उपस्थिती होती. बानय्या जनगाम यांचे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व अविसंचे आजी -माजी पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेस सिरोंचा तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी,नगरसेवक सतीश भोगे, नगरसेवक,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सतीश गंजीवार, नगरसेवक जगदीश रालाबंडीवार,माजी उपसभापती कृष्णामूर्ती रिक्कूला, सिरोंचा शहर अध्यक्ष रवी सुलतान, सरपंच अजय आत्राम, सूरज गावडे,लक्ष्मण गावडे,दुर्गेश लंबाडी,राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया प्रतिनिधी तिरुपती चिट्याला, लक्ष्मण बोल्ले,गणेश रच्चावार आदींनी अभिनंदन केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here