
शारदा भुयार वाशिम जिल्हा प्रतिनिधी – केंद्र तथा महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त आणि सामाजिक न्याय विभागाच्या सामाजिक अंमलबजावणी करणाऱ्या राज्यातील एकमेव असलेल्या महाराष्ट्र दलित तरुण संघटना अर्थात मदत सामाजिक संस्था नागपूरच्या यंदाच्या सण २०२५ च्या विविध राज्यस्तरीय, पुरस्कारामध्ये यवतमाळ येथील आदर्श शिक्षिका, व स्त्री शक्ती मंच संघटनेच्या यवतमाळ जिल्हाध्यक्ष सावित्रीबाई फुले संस्थेच्या सचिव आहेत अनेक संस्थांमध्ये त्या कार्यरत आहेत शिवाय धडाडीचे व्यक्तिमत्व प्रसिद्ध आहे सामाजिक क्षेत्रात त्यांचं उल्लेखनीय कार्य आहे, माधुरी ताई हा शिक्षण कार्यामध्ये नेहमी उत्कृष्ट काम करत आहेत त्यामुळे त्यांना, यावर्षीचा सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला, त्यांच्या या निवडीचे सर्वत्र कौतुक होत असून, ठिकठिकाणी त्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला, त्यांच्या निवडीचे स्वागत आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी, शारदा भुयार, नीता मदनकर संतोषी भंडारी, स्त्री शक्ती मंच संघटना वाशिम जिल्हा, कारंजा तालुका अकोला जिल्हा या सर्व संघटनांनी व सदस्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले असून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्यात…












