
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक लागली असून या निवडणुकीत सुतार समाज सर्व प्रभागात आपले समाज बांधव निवडणुकीच्या रींगणात उतरविण्याची तयारी करत असून काही समाज बांधवानी प्रमुख राजकीय पक्षात इच्छुक उमेदवार म्हणून इच्छा दर्शवली आहे.
राजकीय पटलावर वारंवार सर्व राजकीय पक्षांनी समाजाची उपेक्षा केली असल्याने समाज बांधवानमध्ये सर्व पक्षांबद्दल नाराजीचा सुर आहे. त्या मुळे समाजाच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयामुळे ज्या प्रभागात या समाजाची संख्या जास्ती आहे तिथे कोणत्या पक्षाला या निर्णयाचा फटका बसेल हे पाहावं लागले..















