prabodhini news logo
Home गडचिरोली जि. प.(मा.शा.) हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, सिरोंचा येथे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनी...

जि. प.(मा.शा.) हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, सिरोंचा येथे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनी चे थाटात उदघाटन

0
127

रामगोपाल अट्टेला विशेष तालुका प्रतिनिधी सिरोंचा – आज दिनांक 18 डिसेंबर 2025 ला जि. प.(मा.शा.)हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, सिरोंचा येथे 18 डिसेंबर 2025 ते 20 डिसेंबर 2025 पर्यंत तीन दिवसीय विज्ञान प्रदर्शनी चे उदघाटन मोठ्या उत्साहात आणि थाटात पार पाडले.
प्रदर्शनीचे उदघाटन तनुश्रीत धर्मरावबाबा आत्राम ,सिनेट सदस्य, गोंडवाना विद्यापीठ. यांच्या हस्ते झाले, तर
कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान मा. अजय सुकंदरदार , तहसीलदार,तहसील कार्यालय सिरोंचा. यांनी भूषविले. विशेष अतिथी म्हणून सुखीराम एन. कस्तुरे गटविकास अधिकारी, पं. स. सिरोंचा . डॉ.कन्नाके , तालुका वैद्यकीय अधिकारी, सिरोंचा, किशोर चव्हाण गटशिक्षणाधिकारी , सिरोंचा. एन.आर. मरसकोल्हे मुख्याध्यापक जि. प.(मा.शा.) हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, सिरोंचा. के आर सोमनपल्ली केंद्र प्रमुख सिरोंचा,व्ही के राठोड, केंद्र प्रमुख असरअली तसेच सर्व केंद्राचे केंद्र प्रमुख सर्व शासकीय आणि खाजगी शाळेचे मुख्याध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर चव्हाण गटशिक्षणाधिकारी यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जियानाज हुसैंन, समीर शेख यांनी केलं. तर मान्यवरांचे आभार के. वाय जगदाभी सर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here