prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – चाहूल

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – चाहूल

0
100

तुझीच चाहूल मला
नकळत जागून जाते
वेडे मन माझे सखी
तुझ्यातच गुंतून राहते।।

दूर जरी असलो तरी
भास तुझाच मज होतो
अल्लड वारा होऊन मन
तेच प्रीतीचे गीत गातो।।२।।

पडते भूरळ मनाला
आणि मन वेडेपिसे होते
पाहून रूप सखे तुझे
मग भानही विसरून जाते।।३।।

लागून राहते ओढ तुझीच
या चांदण्यात फिरताना
भास होतो अवती भोवती
तू सुगंध होऊन दरवळताना।।४।।

विसरून जातो रंग नभाचे
तूच शोभते नवरंग परी
तुझीच चाहूल सगळीकडे
तूच आहेस स्वप्नं सुंदरी।।५।।

तुझे नि माझे गोड नाते
असे जन्मोजन्मी रहावे
तुझाच हात हाती घेऊन
मीही सप्तपदी चालावे।।६।।

प्रा. समिंदर निवृत्तीराव शिंदे
लातूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here