prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – सुगंध

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – सुगंध

0
110

बकुळीचा मंद सुगंध
पहाट वेळी दरवळला
वेचलेल्या फुलांचा गजरा
तुझ्या केसात माळला

धुंद मन वेडावले
तुज सवे स्वप्नी रंगले
प्रितीचे क्षण अलवार
श्वासात भरूनी घेतले

अत्तराचा फाया सखे
तू दिलेला ठेवीन जपून
आठवण गोड क्षणांची
जगतो पुन्हा फिरून

जीवनाचे गीत गाऊ
सोबतीने सुखाने
मैफिल रंगेल आपुली
भिजुनी सुगंधाने

ओंजळीत माझ्या यावे
तुझ्या प्रितीचे दान
संसाराचे चित्र देखणे
रेखाटते माझे मन

सौ. वंदना शशिकांत पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here