prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष कविता – राष्ट्रसंत गाडगे महाराज

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष कविता – राष्ट्रसंत गाडगे महाराज

0
146

.२३ फेब्रुवारी १८७६ रोजी अमरावतीत जन्म झाला त्या महान संताचा!!
आपल्या वाणिने, कार्याने, कीर्तनाने बेळा उचलला
समाज प्रबोधनाचा!!
घेऊनी हाती झाडु आणि मडके,
राबविला उपक्रम तो ग्रामस्वच्छतेचा!!
दगडधोंडयात देव नाही रे पुजु नका तयास, दयावे शिक्षण रुपी यंत्र हाती
करुया उद्धार समाजाचा!!
गावोगावी खेळोखेळी,
करुनी किर्तन, आपल्या किर्तनातुनि केला प्रचार प्रसार
अंधश्रद्धा निर्मूलनाचा!!
पाहुणी किर्ति तयाची,
डेबुजीच्या अंगि जन्म झाला तो गाडगे महाराजाचा!!
संपूर्ण जीवन भर गायीले गुण गाण, केला प्रचार आणि प्रसार बाबासाहेब आंबेडकरांच्या सिद्धांताचा!!
वार्ता कळताच भीमरावांच्या निधनाची.
खचला तो संत, स्वतः ला खोलीत करुनी बंद. त्याग केला अन्नाचा!!
बाबासाहेब गेल्यानंतर
अवघ्या पंधरा वीस दिवसानंतरच
करून अंत झाला त्या महान संताचा, थोर समाजसुधारकाचा, किर्तन काराचा!!!!
करते सलाम त्यांच्या किर्तिला, करुया विरोध अंधश्रद्धेला, ठसा उमटवुया जगी
महान संत कीर्तनकार गाडगे महाराजाचा!!!!!

कुमुद फुलझेले
नागपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here