prabodhini news logo
Home कल्याण प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह‌ तर्फे विशेष कविता – राष्ट्र संत गाडगेबाबा

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह‌ तर्फे विशेष कविता – राष्ट्र संत गाडगेबाबा

0
94

चालविले अभियान,
ग्रामस्वच्छतेचे खरे.
केले प्रभावी कीर्तन,
जनजागृतीचे ठरे..१

दलितांच्या उद्धारास,
पूर्ण आयुष्य झटले.
समाजप्रबोधनाचे,
कार्य गावोगावी केले..२

देव नाही दगडात,
देही मानवाच्या वसे.
हीच शिकवण त्यांची,
जनजागृतीची असे. ३

ठिगळ्यांचा अंगरखा,
हाती गाडगे खराटा.
अंगी फाटकी गोधडी,
ग्राम स्वच्छतेचा वाटा. ४

नाव डेबूजी हे खरे,
म्हणे त्यां गाडगेबाबा.
अंधश्रद्धा अज्ञानता,
यांचा उठविला ताबा. ५

सौ. रेखा मालपुरे
कल्याण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here