prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – राष्ट्र संत गाडगेबाबा

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – राष्ट्र संत गाडगेबाबा

0
104

अंधाराचा नाश कराया,
सूर्य असा हा तळपला
हाती घेऊनी झाडू त्याने,
स्वच्छतेचा मंत्र दिला!…१.

दगडातला देव टाळूनी,
माणसातला देव पाहिला
कीर्तनातून प्रबोधनाचा,
झरा अखंड वाहिला….२.

‘नकोत नैवेद्य देवाला,
गरिबाचे पोट भरा’
असा सांगणारा संत हा,
विरक्त अन् खरा!….३.

जातीधर्माच्या भिंती तोडल्या,
शिक्षणाचे महत्त्व सांगितले
माणुसकीच्या मंदिरातच,
त्याने विश्व कल्पिले!….४.

शेंदरी दगडावरती कधी,
नतमस्तक तो झाला नाही
रंजल्या-गांजल्यांशिवाय,
दुसरे तीर्थ त्याला नाही!…५.

गाडगे हाती, खांद्यावर गोधडी,
असा फकीर हा राजा होता
स्वच्छ आणि र्निमळ
समाजाचा, तोच खरा
गाजावाजा होता!….६.

सौ अनुराधा मारचट्टीवार
हैदराबाद तेलंगाना.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here