prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – सुगंध

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – सुगंध

0
86

सद्गर्माच्या कीर्तीने
घडावे सुंदर आयुष्य
सुगंध दुमदुमावा
जणू भाव परिसाचा

भेटतात वाचाळ वीर
रमलेल्या आयुष्यात
बरेच बुरे करताना
ना पुण्य उरे खात्यात…

एकमेका साह्य
उद्घोष सार्थ चंदनापरी
घडावी सदा सत्संगत
मानवतेच्या याव्या सरीवर सरी….

खडकाळ माळरानावर
पेरणी का सद विचारांची
असतात काही नतदृष्ट
दुर्गंधी पसरवतात अफवांची…..

नाभित कस्तुरीचा सुगंध
जागा का चुकतो शी
लाभ घे सज्जनांचा
हे आयुष्य का बिघडवतो शी….

गायकवाड मनोज रामचंद्र
शहापूर जिल्हा ठाणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here