
अकोला प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क : अमरावतीच्या चांदुर रेल्वे निवडणुकीत शानदार यश मिळवल्यानंतर, नवनिर्वाचित नगराध्यक्षा आणि नगरसेवकांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची सदिच्छा भेट घेतली. अकोला येथील ‘यशवंत भवन’ येथे सर्वांनी भेट घेतली.
शिलेदारांचा सन्मान :
यावेळी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी चांदुर रेल्वेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा प्रियंका विश्वकर्मा यांचा सत्कार केला. त्यांच्यासोबतच नगरसेवक हर्षल वाघ, अरिहंत गेडाम, श्रीकांत भोयर, केशव केने, राजेश सराफी, प्रवीण खेडकर, योगेश आसोले, राजू शेख आणि नगरसेविका निलोफर शेख यांचाही पुष्पगुच्छ व शाल देऊन गौरव करण्यात आला.
या सदिच्छा भेटीवेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. निलेश विश्वकर्मा यांचीही प्रमुख उपस्थिती होती. चांदुर रेल्वे नगर परिषदेवर वंचित बहुजन आघाडीने मिळवलेल्या या यशाबद्दल बाळासाहेबांनी सर्व नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचे अभिनंदन केले.















