prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – तुझी आठवण

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – तुझी आठवण

0
173

आठवणी मनातल्या
साठवल्या, साचल्या जीवनात
ढवळून अंतरंगात भावविश्व ||१||

जिव्हाळा जीवनात
आपुलकी ही हवीहवीशी
प्रेमाचा दरदिवशी प्रतिसाद ||२||

मन भयभीत
भविष्याचे भय नसावे
अस्तित्व रहावे
वर्तमानाचे ||३||

चंचल मन
आकाशात उंच उडे
जमीनीवरच पडे पाऊल ||४||

भक्तीभाव मनात
रामनाम जप असावा
गोड व्हावा जीवनांतं ||५||

मन सुंदर
घेऊया जीवन आस्वाद
देवधर्माचा नाद जगण्यासाठी ||६||

मन माझे
असेल जर शांत
रहावे निवांत निरंतर ||७||

(स्वरचित)
©®नीला चित्रे
चिंचवड पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here