
नाताळचा सण
आहे आनंदाचा
येशू ख्रिस्ताच्या
सार्थ स्मरणाचा. (1)
प्रेषित देवाचा
सेवा मानवाची
भूत दया शांती
देणगी मोलाची. (2)
घरदार सजे
भेटवस्तू खूप
ख्रिसमस ट्रिचे
मनोहर रूप. (3)
चमचम तारे
घरी अवतरी
लहान मुलांशी
गूज गोष्टी करी. (4)
लाल लाल झगा
टोपी मजेदार
सांताकाॅज येता
हसे घरदार. (5)
केक व मिठाई
गरीबांना देई
मुखी घास घाली
मोद सवे नेई.(6)
आनंद उल्हास
सण देतो खास
तिथेच असतो
देवतेचा वास. (7)
मे री ख्रि स म स
अंजली गरगटे .(पुणे)















