
सरत्या वर्षाला निरोप देऊन
नवीन वर्षाच स्वागत करू
झाले गेले विसरून सर्वच
पुन्हा सद्गुणांची कास धरू।।१
गेलेल्या या वर्षाने आम्हाला
खूप खूप काही सांगून गेले
कायम राहत नाही कोणती गोष्ट
आशी आम्हाला शिकवण दिले।।२।।
जे होते आपलीच माणसं
नकळतपणे ते दूर झाले
आणि जे होते कधी परके
ते नकळतपणे जवळ आहे।।३।।
ऊन सावलीसारखे होते
दोन हजार वर्ष पंचवीस
कधी होता ओला दुष्काळ तर
कधी मन झाले कासावीस।।४।।
कधी कधी स्वप्नंही तुटली
कधी कधी खूप प्रेम मिळाले
एका डोळ्यात अश्रू होते तर
एका डोळ्यात सुख झळकले।।५।।
अनेक पुरस्कार मिळाले
कवी म्हणून ओळख झाली
प्रबोधिनी मंचाची संचालिका
काव्य क्षितिज स्थापना केली।।६।।
अनेक चढ उतार आले इथे
तरीही डगमगले नाही कधी
नवीन जोमाने काम करून
वेगळा ठसा उमटविला आधी।।७।।
सरत्या वर्षाला निरोप देताना
मनही भरून नक्कीच आले
सुख दुःखाच्या शिदोरीला बांधून
नवीन वर्षाच्या स्वागतास सज्ज झाले।।८।।
येईल वर्ष सुखाचे समाधानाचे
याचीच आस मला लागली आहे
डोळ्यामध्ये नवं नवीन स्वप्नं ती
पुन्हा एकदा खरंच जागली आहे।।९।।
प्रा. समिंदर निवृत्तीराव शिंदे, लातूर















