
येते जाते वर्ष नेहमीचे येत्याचे नाव नुतन वर्ष
दिवस असतात तेच संपल्याचा जल्लोष येत्याचा हर्ष
वर्षभरात काय हरवले, काय गवसले आपणास माहीत
पुर्ण वर्ष देतो सोडून फक्त एकच दिवस धरतो गृहीत
तिनशे पासष्ट दिवस मराठी एका वर्षाचे असतात
एक जानेवारी हर्षोल्लास बाकीचे काय तुमचे नसतात
वर्षाचे सर्वच दिवस आनंद सुख दुख चैन मानायचे
नैसर्गिक बदल घडणारे त्याचे सातत्य कशाला जानायचे
गेलेल्याचा रुसवा फुगवा नाही मनाला खट्टू करायचे नाही
येणाऱ्या वर्षात खचनार नाही स्वमनाला द्यावी ग्वाही
येणारे जाणारे नेहमीचे दिवस नवचैतन्य करावे जागृत
शिल सदाचाराने जगावे आयुष्य,धम्माचे प्यावे बोधमृत
नैसर्गिक ऋतूपर्वाच कालचक्र आपण नाही जानत
मानव निर्मित वर्षाचे महीने उगीच असतो गिणत
नंदा भगत /कारंजा लाड
वाशिम















