prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – सरत्या वर्षाला निरोप

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – सरत्या वर्षाला निरोप

0
122

कधी रुसलो कधी हसलो
लाविले होते मायेचे रोप
काही साध्य काही असाध्य
देतो मात्र सरत्या वर्षाला निरोप

काव्यपंक्तीच्या दुनियेत
रोजचा भरला होता मेळा
शेरोशायरीने माझ्या
सुंदर शब्दांचा झालाय मळा….

सुसंस्कारित वचनांनी
आयुष्याला जोडली नाती
कानाफुशीच्या विकारी बाणांनी
मानवतेची केली आहे माती….

नवे मित्र नवीन नाती
नवीन गीत सप्तसुरांचे
भावभावनांच्या मांदियाळीत
नाते आपुलकीच्या माणसांचे…..

निरोप सरत्या वर्षाला
बोध घेतलाय नव संजीवन
नवीन पालवी अंकुरेल
साज येईल हे निर्मल मन….

$गायकवाड मनोज रामचंद्र
शहापूर जिल्हा ठाणे ©

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here