prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – सरत्या वर्षाला निरोप

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – सरत्या वर्षाला निरोप

0
131

सरत्या वर्षाला निरोप देतानां!
सर्व सुख दुःख विसरून जावे!
आपुलकीची नाती जपतानां
वैर दुश्मनी दुर सारुन जगावे!!

दिवसा मागून दिवस जातात!
संकटातही वर्ष येतो आणि जातो!
आशा नव्या वर्षाची वाट बघते!
आंनद घेऊन नवा भाव फुलतो!!

चांगले वाईट विचार मनाला !
भुरळ घालून जीवनात आले!
आयुष्य फुलत डुलत हसले!
बघता बघता वर्ष निघून गेले!!

आठवणी जपून ठेवू नव्याने
झाले गेले विसरून सारे जाऊ
जोडून नाते प्रितीचे जीवनी
मोलाचे क्षण आनंदी गुण गाऊ —!!

हात पुढे मदतीचे नव्या उम्मेदीने
बोलत राहू गोड बोल सळसळणारे
समजून जन ते अपुलेची सगळे
निरोप देऊन सरत्या वर्षाला सारे—!!

सौ. सविता संजय भोयर
राजुरा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here