
कधी कधी तुझ्या सवे
गुपित मी बोलावे
मनातले चांदणे
तुझ्यासमोर खोलावे……
मनातल्या चांदण्यांनी
मन हे तुडुंब भरले
तुझ्या समोर खोलण्यास
मन ऊतू ऊतू चालले…..
तुझ्या आठवणीने
मन हे आतूरले
वेड लागले मला
भान हे हरपले…….
मनातले चांदणे
चमचम करी जसे
हसरे हे रूप तुझे
दिसे डोळ्यात जसे……
नजरेला माझ्या तुझी
वाट ही वाट दिसे
मनातले चांदणे
चमचम करी जसे……
वाट तुझी बघून बघून
चांदणेही गेले लपून
आकाशात चंद्रमाही
गेला ढगामध्ये लपून…..
येना सख्या आज तू
मन हे आतूरले
वेड लागले तुझे मला
भान ही हरपले……
सौ.रंजना धर्मपाल आटे
रा. वर्धा















