
नव्या विचारातून उमगले
मार्ग जीवन जगण्याचे
दुःखाला कायम दूर करून
सदैव आनंदी राहण्याचे (१)
स्वप्नांना मिळाली दिशा
निश्चयाने यश पदरी पडले
सरत्या वर्षांत बरेच काही
बरेवाईट अनुभव पुढे आले (२)
आपल्या माणसांच्या सानिध्यात
सुखाचे काही क्षण सापडले
जीवन संघर्षाच्या वादळात
आत्मविश्वासाने सारे पेलेले(३)
माणुसकीचे बीज पेरत
शिकवण मिळाली विचारातून
जुन्या वर्षांनी दिली ओळख
आयुष्य बहरले कष्टातून (४)
कधी हसरा कधी रडका
मिळाला सहवास भरभरून
सरत्या वर्षाला निरोप
आठवणी जपलेल्या हृदयातून(५)
डॉ. स्मिता गजभिये /तिरपुडे
लाखनी,जिल्हा.भंडारा















