prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – आठवणी गत वर्षीच्या

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – आठवणी गत वर्षीच्या

0
95

सुख दुःख गेले देऊनी
क्षण आठवणी ठेऊनी

घे उंच भरारी गगनी
ध्येय ये कवेत घेउनी

दे अहंकार सोडुनी
घे अंतर्मना ओळखुनी

कित्येक गेले सोडुनी
क्षणभंगुर हे जीवनी

सारे इथेच जावे सोडुनी
मागे जावे आठवणी ठेऊनी

नवीन पालवी वृक्षा फुटुनी
पाचोळा होऊनी पडतो अवनी

नश्वर आहे जग हे सारे
मिथ्या मागे नको धावू रे

गोड आठवणी मागे ठेऊनी
गेले गत वर्ष हेच शिकवुनी

प्रतिभा सडेकर
वडगाव बेळगाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here