prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – तुझी आठवण

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – तुझी आठवण

0
105

क्षण सरले, दिवस उडाले,
२०२५ चे पान आता उलटले,
कधी हसलो, कधी रडलो,
ह्या वर्षाने खूप काही शिकवले.
​काही माणसे नवी भेटली,
काही जुनी मागे सुटली,
मनाच्या कोपऱ्यात मात्र,
प्रत्येक आठवण जपून राहिली.
​स्वप्नांच्या मागे धावताना,
थोडं स्वतःलाही विसरलो,
पण धडपडत का होईना,
यशाच्या वाटेवर थोडे सावरलो.
​नव्या वर्षाची चाहूल लागली,
जुन्या आठवणींची ही शिदोरी,
२०२५ तुझी ही सोबत,
राहील कायम मनाच्या घरी.
​आता निरोप घेताना तुझे,
डोळ्यांत थोडी ओढ आहे,
कडू-गोड अनुभवांनी नटलेली,
तुझी आठवण खूप गोड आहे.

सौ. अनुराधा मारचट्टीवार
हैदराबाद तेलंगाणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here