
“चाहुल लागली रे मला नववर्षाची पण काय करू येतेय मला तुझी आठवण”!! १!!
“वर्षाच्या या बारा महिण्यात कधी केव्हा काय काय घडले”
हे उमगताच येतेय रे मला तुझी आठवण” !! २!!
‘” वाटले मला गतवर्षी प्रमाणे हेही वर्ष आनंदात जाईल ”
पण भोवतालची परिस्थिती पाहता येतेय रे मला तुझी आठवण” !!३!!
“कधी डोळे मिटविले तर, दररोज होणारा बलत्कार दिसतोय मला”
सुजलाम सुफलाम भारत आपुला”त्यात होणारा भ्रष्टाचार, अत्याचार पाहून येतेय रे मला तुझी आठवण “!! ४!!
“अंधश्रद्धेचा घेऊनी डोंगर उरी,
बनावटीचे करुनी राजकारण.
तपोवनाची केलेली कत्तल पाहुन उर दाटून येई तेव्हा येतेय रे मला तुझी आठवण”!! ५!!
” सरत्या वर्षाला निरोप देताना सुखद-ुदुखद जे काही घडले,
ते मनी माझ्या साठवुन करतेय रे मी नेहमी तुझी आठवण” !!६!!
“काय कमावले काय गमावले,
लोटत असे वर्षानुवर्षे गेले,
वर्षाच्या या आठवणी ने कधी चांगले तर कधी वाईट ही अनुभव दिले.
तरी काळ न थांबता कुणाला नव वर्ष हे जवळ आले,
आशेचा किरण ही बघता, नकळत येतेय रे मला तुझी आठवण” !! ७!!
कुमुद फुलझेले
नागपुर.















